नवापुर। येथील सहकारात अग्रेसर अललेली श्री स्वामी विवेकानंद नागरी सह.पतसंस्थेची 23 वी वार्षिक सर्व साधारण सभा संस्थेचे व्हा.चेअरमन घनश्याम परमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. संचालक हेमंतभाई शाह, नयन सोनार, पांडुरंग सोनवणे, रमेश पानपाटील, विजय बागुल, शरद मोरे यांच्याप्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन व श्री स्वामी विवेकानंद प्रतिमेस पुप्षहार घालुन अभिवादन करण्यात आले.
सभेत विविध विषयांवर झाली चर्चा
व्हा.चेअरमन परमार यांनी पतसंस्थेच्या आर्थिक वर्षात केलेल्या प्रगतीचा आढावा सभागृहात सादर केला. संस्थेची आर्थिक परिस्थिती अत्यंत भक्कम असुन संस्था 25व्या वर्षाकडे वाटताल करीत आहे. संस्थेला मार्च 2017 अखेर 11 लाख 35 हजार 452 एवढा नफा झाला असुन 15 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे पतसंस्थेचे संचालक हेमंत शाह यांनी सांगीतले. सभेचे इतिवृत्त व अहवाल वाचन व्यवस्थापक भास्कर मोरे यांनी सभेत ठेवला असता सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली.
याप्रसंगी पतसंस्थेचे संचालक हेमंतभाई शाह यांची मर्कन्टाईल को.बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल, मुकुंदजी निकम याच्या वनवासी ऊत्कर्ष समिती या संस्थेस राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल व कवी विजय बागुल यांना गुजरात येथील बडोदा मराठी साहित्य परिषदेचा साहित्याचा मानाचा राष्ट्रीय कवी चंद्रशेखर पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संचालक रमेश पानपाटील व आभार संचालक शरद मोरे यांनी मानलेत. अल्पोपहाराने सभेची सांगता झाली. सभा यशस्वितेसाठी कर्मचारी यशवंत दुसाने, मयुरी प्रजापत, रुबजी गावीत, कमिशन एजंट निताताई दुसाने, प्रकाश पाटील, राजेंद्र सोनार, योगेश सोनार, कृष्णदास सोनवणे, सागर दुसाने यांनी परिश्रम घेतले. यावेळी बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.