स्वामी विवेकानंद संस्थेेचे कार्य विद्यार्थ्यांसाठी लाभदायी

0

शिरपूर। स्वा स्वामी विवेकानंद बहुउद्देशिय संस्थेने सुरू केलेले कार्य हे विद्यार्थ्यांच्या भविष्यात निश्‍चितच लाभदायी ठरणार असून यासाठी संस्थेला जी मदत लागेल ती करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे यांनी केले. ते तालुक्यातील बलकुवे येथील स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्व. जगन्नाथ काशिराम पाटकर व हिराबायजा जगन्नाथ पाटकर यांच्या स्मरणार्थ शहरातील एस.पी.डी.एम.कॉलेजच्या सभागृहात घेण्यात आलेल्या विद्यार्थी चिंतन शिबीरात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी एस.पी.डी.एम. कॉलेजचे प्राचार्य एस.एन.पटेल, उपप्राचार्य ठाकरे बलकुवा माजी सरपंच एकनाथ बोरसे , हरीभाऊ पाटील, प्रा.विठोबा इशी, प्रा.एस.वाय.महाजन, ईश्‍वर दोरीक, एम.जी.दोरीक, अहिरराव सर, प्रकाश महाजन, प्रा.आर.डी.पाटील, प्रकाश पाटील, प्रशांत पाटील (वाडी) यांच्यासह पालक व विद्यार्थी हजर होते.

यांनी पाहिले कामकाज
एम.जे.नवले, प्रा.मनोज पटेल, प्रा.संदिप गिरासे, प्रा.भास्कर महाजन, प्रा.महेश सैंदाणे,प्रा.मनोज बेहरे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.प्रा.वेलंगे यांनी त्यांचे अनुभव कथन केले. प्रा.रविंद्र महाजन, डॉ. धर्मिष्ठा दोरीक यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमधून पुजा देारीक , साधना चौधरी, भटू पाटील, सारंग दिनानाथ, कल्याण महाजन आदिंनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा पाटील, प्रा.डॉ.संगिता महाजन यांनी केले. यशस्वीतेासाठी लिलाचंद इशी, सी.डी.पाटील, परेश दोरीक, संजय पाटील, रमेश पाटील, नामदेव पाटील, जगन्नाथ दोरीक आदींनी कामकाज पाहिले.

सखोल मार्गदर्शन
संस्थेचे अध्यक्ष नाथुभाई दोरीक यांनी चिंतन शिबीर घेतल्याने विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेमध्ये वृद्धी होत असल्याचे सांगत शैक्षणिक जीवनात दुसर्‍याला ज्ञान देण्याचे काम करणे गरजेचे आहे. चिंतन शिबीर झाल्यानंतर त्यावर चिंतन हे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जीवनात प्रसन्नता आणणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा.दिपक माळी यांनी यशस्वी होण्यासाठी लागणारे गुण व करावे लागणारे परिश्रम यावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

सदैव संस्थेच्या पाठिशी
तुषार रंधे यांनी अध्यक्षीय मनोगतात पुढे सांगितले की, चांगल्या गोष्टी करण्यासाठी कधीही विचार केला नाही तरी चालेल. परंतु वाईट गोष्टी करण्यासाठी हजार वेळा विचार करणे आवश्यक आहे. स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेने सुरू केलेला हा उपक्रम निश्‍चितच विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरणारा आहे. विशेष म्हणजे आपल्या येथील विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे ही अभिमानाची बाब आहे. संस्थेच्या या चांगल्या उपक्रमासाठी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.