स्वामी विवेकानंद हे युवकांचे ऊर्जास्त्रोत

0

सणसवाडी । मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती, नेतृत्व, गुरू भक्ती, देश प्रेम, निर्भय वृत्ती असे अनेक सेवाभावी गुण स्वामी विवेकानंद यांच्या अंगी होते. अनेक तरुणांनी स्वामीजींचे विचार अंगीकारले आहेत. त्यांचे ऊर्जास्त्रोत स्वामी विवेकानंद ठरले, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक प्रा. कुंडलिक कदम यांनी केले. हडपसर येथील आण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर शिरूर तालुक्यातील दरेकरवाडी येथे संपन्न झाले. या शिबिराच्या सांगता समारोपात स्वामी विवेकानंद युवकांचे प्रेरणास्थान या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.

या शिबीरांतर्गत आठवडाभर ग्रामस्वच्छता करण्यात आली. यात स्मशान भुमी, ग्राम मंदिर स्वच्छ करण्यात आले. सामाजिक विषयावर स्त्री-पुरुष समानता, कन्यारत्नन, स्त्री भ्रृणहत्या तसेच आप्पती जोखीम व्यवस्थापन, मुलांसाठी विज्ञान प्रदर्शन, प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षारोपण, शिबीरार्थींचे नाट्य, विविध विषयांवर मान्यवरांचे व्याख्यान झाले. यावेळी प्रभाकर मुसळेसर यांनी देश भक्ती पर गाणी सादर केली. शिबीर प्रमुख प्रा. ज्ञानेश्‍वर अवसरे, डॉ. प्रा. नेहा पाटील, प्रा. मेघमाला वाघमोडे, प्रा. अनिल झोळ यांनी विशेष परिश्रम घेतले. किरण नवले यांनी आभार मानले.