बीड । अखिल भारतीय श्री स्वामी सेवा मार्ग दिंडोरीच्या वतीने घाटकोपर मुंबई येथील पोलीस मुख्यालय मैदानावर राष्ट्रीय मोळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यात 50 हजाराहून अधिक श्री स्वामी समर्थ भाविक व गुरुमाऊलींनी सपत्नीक श्री सिद्ध लक्ष्मी कुबेर यंत्र पूजन केले. अध्यात्मिकतेच्या आधारावर समाजऋणफेडण्याचे भावना जागृत करुन भाविकांना रचनात्मक कामांची दिशा देण्याचे काम या परिवारात होते.
दोन मंत्र्यांचीही उपस्थिती
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी सक्षम व्हावी व सर्व तमाम जनता आर्थिकरित्या सुखी संपन्न होऊन संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा यासाठीच मुंबादेवीस सामुदायिक पूजन व विनंती केली. देशातील भ्रष्टाचार, अनाचार, दहशतवाद, दुष्काळ, महायुद्ध संकट दूर व्हावे, सर्व जनतेचे कर्ज निवारण व्हावे शेतकरी सुखी होऊन त्यांच्या आत्महत्या थांबाव्यात अशी अनेक उद्दिष्ट या राष्ट्रीय मेळाव्याचे होते. महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर व मराठा महासंघाचे शशिकांत पवार इत्यादिसह मान्यवर उपस्थित होते . श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून विनाहुंडा सामुदायिक विवाह, आयुर्वेद आरोग्य, आध्यात्मिक शेती, बालसंस्कार, मराठी अस्मिता व मराठी संस्क्रुती, व्यसनमुक्ती, वास्तुशास्त्र आदी अनेक विभागांचा आढावा गुरुमाऊलींनी घेतला. या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या शहरी भाविकांना शेतकर्यांच्या समस्यांबद्दल माहिती देत मदतीचे आवाहन करण्यात आले.