स्वार्थापोटी भाषेचा वापर देशाच्या विभागणीसाठी: मोदी

0

नवी दिल्ली: बहुभाषिक असणारा भारत जगातील एकमेव देश आहे. ‘भाषेचा फायदा घेत अनेकांनी भारतात स्वार्थापोटी विभागणी करत आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केल्याची, खंत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषेतही ताकद असून त्याचा वापर करत आपण सर्वांना एकत्र आणले पाहिजे यासाठी आवाहन केले. आज शुक्रवारी ३० रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्हचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. नरेंद्र मोदी यांनी या माध्यमातून नवा भारत विषयावर आपले विचार व्यक्त केले.

‘हा नवा भारत आहे जिथे तरुणांचं आडनाव काय आहे यामुळे फरक पडत नाही. तर आपलं नाव सिद्द करण्याच्या क्षमतेला महत्त्व आहे. काही मोजक्या लोकांचा नाही तर प्रत्येक नागरिकाचा आवाज ही नव्या भारताची ओळख आहे. नव्या भारतात भ्रष्टाचाराला स्थान नाही, मग ती व्यक्ती कोणीही असो’, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले .

आपण रोज वेगवेगळ्या भाषेतील १० ते १२ शब्द छापले पाहिजेत. यामुळे एका वर्षात एक व्यक्ती वेगळ्या भाषेतील ३०० नवे शब्द शिकू शकते. विचार करा हरियाणामध्ये मल्याळम शिकली जात आहे, कर्नाटकमध्ये बंगाली. इतकं मोठं अतंर पार करण्यासाठी फक्त एक पाऊल उचलण्याचं गरज आहे. आपण ते पाऊल उचलू शकतो का ?’ अशी विचारणा यावेळी नरेंद्र मोदींनी केली.