स्विमिंग पूलमध्ये पोहताना जिम ट्रेनरचा मृत्यू

0

पुणे- पुण्यातील सहकारनगर भागातील पुणे महानगरपालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना जिम ट्रेनरचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सूरज गायकवाड (वय २८, रा. बिबवेवाडी, अप्पर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

बिबवेवाडी येथील सूरज गायकवाड हा आज (सोमवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत सहकारनगर येथील स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. सर्व मित्र पोहत असताना त्यांच्यात सूरज नसल्याचे लक्षात आले. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो बुडाल्याचे त्यांना आढळले. त्याला त्वरीत जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.