स्वीमिंग पूलमध्ये जाऊन धडकली कार

0

अमेरिकेतील कॉरलेडो स्प्रिंग्ज महापालिका हद्दीतील स्विमिंग पूल मध्ये एक कार अनेक अडथळ्यांवर आदळत अखेर स्विमींग पूल मध्ये पडली. चेएन्ने माउंटन हॉटेलमधून निघत असतान ७३ वर्षांच्या चालक महिलेने ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबला. रस्ता चढावाचा होता. कारने वेग पकडून जवळ जवळ उड्डाणच केले. एक लहान भिंत ओलांडून कार पलिकडच्या स्विमींग पूलमध्ये कोसळली. त्यावेळी तिथे कुणी पोहत नसल्याने अनर्थ टळला, असे पोलिसांनी सांगितले. लोकांनी सिटबेल्ट बांधलेल्या या महिलेला वाचवले. कार बाहेर काढण्यासाठी स्विमींग पूलमधील पाणी बाहेर काढावे लागले.