जळगाव : अखिल भारतीय लेवा विकास महासंघ व रिया स्पार्टस् अॅकडमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. निखिलभाऊ खडसे यांचा 31 डिसेंबर जन्मदिवस निमित्त त्यांच्या स्मरणार्थ जिल्हा स्तरीय खुला कराटे स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेंत जिल्ह्याभरातून 260 खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेंत पोलिस स्पोर्टस् क्लबने सर्वात जास्त सुवर्णपदक पटकवत प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक रायसोनी इंग्लिश मिडिअम स्कुल, तृतीय पाळधी येथील इम्पीरीयल स्कूलने पटकविले.
या स्पर्धेंचे उद्घाटन डॉ. संजय हुजूरबाजार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल भंगाळे, सचिव अनिल झवर. डॉ. प्रशांत वारके, बिजेश जैन, महेंद्र पाटील, मनोज वाणी, बिपीन झोपे, राजेश वारके आदी उपस्थित होते. ही स्पर्धां काताज व फुमते(फाइट) या दोन प्रकारात घेण्यात आली. फाईट वजनी गटात खेळली असून स्पर्धेंमध्ये मुख्यपंच म्हणून पोलीस दलाचे प्रशिक्षक यांनी कामकाज पाहिले. तर टाईम अजब कासीद, प्रविण राव, नितीन चव्हाण, पंकज ठाकूर यांनी काम पाहिले. स्पर्धेंचा बक्षिस वितरण सोहळा आमदार सुरेश भोळे, माजी महापौर विष्णु भंगाळे, बी.बी. पाटील, नुतन मराठा ज्येष्ठ संचालक डॉ. स्नेहल फेगडे, महेश पाटील, अनंत भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यशस्वीतेसाठी आयोजक राजेश वारके, डिंगबर महाजन, सचिन महाजन आदींनी कामकाज पाहिले.