स्व.पी.के.आण्णा पाटील यांनी शिक्षणाचे जाळे निर्माण केले

0

शहादा। स्व.पी.के. आण्णा पाटील यानी खांदेशात शिक्षणाचे जाळे निर्माण केले विध्यार्थ्याना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली विद्यार्थ्यानी त्याचा फायदा करुन घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ कलशेट्टी यानी केले. लोणखेडा येथील पुज्यसानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळ संचलीत औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचा नुतन कार्यलयीन इमारतीचा उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दिपक पाटील होते. याप्रसंगी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोज खैरनार, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, संस्थेचे उपाध्यक्ष किशोर पाटील, संचालक रमाकांत पाटील, प्राचार्य व समन्वयक मकरंद पाटील, कृउबा समिती सभापती सुनील पाटील, दुध संघाचे चेअरमन रविंद्र रावळ, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, व्हा. चेअरमन जगदीश पाटील ,सातपुडा साखर कारखाना व्हा. चेअरमन प्रेमसिंग आहेर, दिलीप बागले, नगीन काळु पाटील, आर.पी.आय जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर नगरसेवक लक्ष्मण बढे उपस्थित होते.

शहादा तालुक्यात सर्व शिक्षणाचे दालन
यावेळी मान्यवरांचा हस्ते नुतन कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी म्हणाले, जिल्ह्यांत शहादा तालुक्यात शिक्षणाचा दृष्टीने सर्व प्रकारचा शाखा व शिक्षणाचे दालन आहे. शिक्षणाची पंढरी व्हावी हा दृष्टीकोण स्व. पाटील यांचा होता. त्यांची शिक्षणाबाबतीची तळमळ होती. त्यांचा वारसा चांगल्या प्रकारे दीपक पाटील चालवत आहे असे सांगुन शुभेच्छा दिल्या. तर दीपक पाटील यानी बोलतांना या भागातल्या शेतकर्‍यांच्या सर्व सामान्यांचा मुलांना उच्च शिक्षण मिळावे हा हेतु अण्णासाहेबांच्या होता . आज हजारो मुले परदेशात आहेत. आम्हाला आनंद आहे. आज शिक्षण ही का काळाची गरज आहे. पालकांनी शिक्षणावर भर द्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पवार यानी केले आभार प्रा. हमीद सैय्यद यानी मानले.