स्व.बाळासाहेब चौधरी प्रेरणा देणारे शिक्षणमहर्षी

0

देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे ; खिरोद्यात अभिवादन सभा

फैजपूर- राज्याच्या राजकारणात स्व.बाळासाहेब मधुकरराव चौधरी 21 वर्ष वेगवेगळ्या पदावर मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांनी शिक्षणासाठी वाट्टेल ते महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले. बाळासाहेब हे एक प्रेरणा देणारे शिक्षणमहर्षी असल्याचे मत ‘देशोन्नती’चे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी येथे व्यक्त केले. रविवारी सकाळी 10 वाजता खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळात स्व.बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी स्व.बाळासाहेब चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी होते.

हे तर शेतकर्‍यांचे वाट लावणारे खाऊ-खादाड सरकार
प्रमुख अतिथी प्रकाश पोहरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अच्छे सरकार अस्तित्वात नसून हे तर खाऊ-खादाड सरकार आहे. या सरकारने शेतकर्‍यांची पूर्णपणे वाट लावल आहे. राज्यात फडणवीस सरकाराने अशा आमदारांना मंत्री पदे दिली आहेत की जे वसुली शंभर टक्के करतात. ऊर्जा मंत्री बावनकुळे हे तर सर्वात वसुलीबाज मंत्री आहेत. त्यांच्याकडे तर नोटा मोजण्यासाठी दहा मशीन ठेवण्यात आले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. हे कसले सरकार ! हे तर वसुली सरकार असल्याची टिका पोहरे यांनी प्रसंगी व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, पंचायत समिती गटनेते शेखर पाटील, तापी परीसर विद्या मंडळाचे लिलाधर चौधरी, एस.के.चौधरी, सचिव प्रभात चौधरी, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, अजित पाटील, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, प्राचार्य डॉ.आर.एल.चौधरी, माजी प्राचार्य डॉ.एस.एस पाटील, संजीव चौधरी, धनंजय चौधरी यांच्यासह मधुस्नेह परीवार उपस्थित होता.