स्व.बाळासाहेब ठाकरे यांना चित्रातून मानवंदना !

0

पुणे – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नारायण पेठेतील वाहनतळाजवळील भिंतीवर बाळासाहेब ठाकरे यांचे ६० बाय ३० या आकाराचे भव्य चित्र साकारून शिवसेनेच्या युवासेनेतर्फे त्यांना मानवंदना देण्यात येत आहे.

पुण्यातील सदाशिवपेठेत बाळासाहेबांचे जन्मस्थान आहे. त्यापासून अगदी थोड्या अंतरावर नारायणपेठेतील वाहनतळ आहे. त्याजवळच्या भिंतीवर बाळासाहेबांचे भव्य चित्र साकारण्यात येत आहे. वॉटरप्रूफ रंगांच्या सहाय्याने निलेश आर्टिस्ट यांनी हे चित्र रेखाटायला घेतले असून संकल्पना कसबा विधानसभा युवासेनेचे प्रमुख निरंजन दाभेकर यांची आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे एवढ्या मोठ्या आकारातील हे पहिलेच भित्तीचित्र असून गेले चार दिवस ते साकारण्याचे काम चालू आहे. आज मंगळवारी २२ रोजी ते पुन झाले. चित्र साकारण्याचे काम सुरू असतानाच ते पहाण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.

उद्या बुधवारी २३ रोजी बाळासाहेबांची जयंती असून त्यानिमित्ताने या चित्राचे औपचारिक अनावरण करण्यात येईल.