भुसावळ- शहरातील जळगाव रोडवरील लोणारी समाज मंगल कार्यालयामागील स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती बाल उद्यानाचे उद्घाटन रविवार, 5 रोजी सायंकाळी पाच वाजता माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे असतील. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, गटनेता मुन्ना तेली, भाजपा सरचिटणीस सुनील नेवे, शैलजा पाटील, पुरूषोत्तम नारखेडे, राजेंद्र नाटकर, शोभा नेमाडे, अमोल इंगळे, अॅड.बोधराज चौधरी, अनिता सपकाळे, मेघा वाणी, मुकेश पाटील, राजेंद्र आवटे, महेंद्रसिंग ठाकूर, निर्मल (पिंटू) कोठारी, मुकेश गुंजाळ, चंद्रशेखर अत्तरदे, मनोज बियाणी, शारदा धांडे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर आदींची उपस्थिती राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन नगरसेवक युवराज लोणारी व भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मीना युवराज लोणारी यांनी केले आहे.