गंगापुरी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
भुसावळ- भुसावळातील नामांकीत पहेलवान स्व.मोहन बारसे उर्फ मोहन पहेलवान यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जामनेर तालुक्यातील गंगापुरी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदानासह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नगरसेविका सोनी संतोष बारसे व माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. भागवत सावकारे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. संतोष बारसे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना वॉटर कुलर भेट देण्यात आले.
या मान्यवरांची होती उपस्थिती
कार्यक्रमास नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक अॅड.बोधराज चौधरी, प्रमोद नेमाडे, महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर, निर्मल (पिंटू) कोठारी, पप्पू बारसे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अर्जुन खरारे यांनी केले. शाळेतर्फे मुख्याध्यापक एस.एस.सोनवणे, माध्यमिक शिक्षक एस.आर.पाटील यांनी दात्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.