पिंपरी चिंचवड – स्व. राजीव गांधी प्रतिष्ठान वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ह.भ.प.जयराम देवकर यांचा हस्ते शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच, उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराज्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाप्रसंगी, ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण गडेकर, विलास साळुंखे, प्रमोद नवले, प्रदिप करडे, अर्जुन कांबळे, गणपती पाटील उपस्थित होते. शिवाजी महाराजांची विचारधारा सोबत घेऊन समाजात समाज जागृती निर्माण केली पाहिजे, असे मत यावेळी संदेश नवले यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराजांचा युवक युवतींनी आदर्श घेऊन भविष्याची वाटचाल करावी, असेही ते म्हणाले.