स्व.वाजपेयी अस्थी विसर्जन स्तंभ उभारणार

0

नगरपरिषदेने दिली मान्यता

आळंदी :  येथील इंद्रायणी नदी घाटावर स्व. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीं यांचे अस्थी विसर्जन स्तंभ स्मारक विकसित करण्यास मान्यता देण्यास आळंदी नगरपरिषद सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर होत्या. आळंदी नगरपरिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेस मुख्याधिकारी समीर भूमकर, उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, माजी उपाध्यक्ष प्रशांत कुर्‍हाडे, सागर भोसले, गटनेते पांडुरंग वहिले, तुषार घुंडरे, माजी गटनेते नगरसेवक आदित्य घुंडरे, प्रकाश कुर्‍हाडे, सागर बोरुंदीया, संतोष गावडे, नगरसेविका मीरा पाचुंदे, स्मिता रायकर, प्रमिला रहाणे, स्नेहल कुर्‍हाडे, पारुबाई तापकीर, प्राजक्ता घुंडरे, सुनीता रंधवे, प्रतिभा गोगावले, शैला तापकीर यांचे सह परिषदेचे विभाग प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

विविध ठरावांना दिली मान्यता

तीर्थक्षेत्र आळंदीत स्व.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीं यांचे अस्थी इंद्रायणी नदीत विसर्जन करण्यात आल्या. त्या परिसरात स्व.अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक विकसित करण्याची मागणी शहर भाजपच्यावतीने करण्यात आली. या सभेने इंद्रायणी नदी घाटावर अस्थी विसर्जन स्तंभ विकसित करण्यास मंजुरी दिली. शासनाकडे मंजूर ठराव कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे. याशिवाय प्रशासकीय तसेच प्राप्त प्रस्ताव नुसार विषय पत्रिकेवरील विविध विषयांना या सभेत चर्च करून मान्यता देण्यात आली. यात निविदा, आरक्षण, खरेदी अशा विविध विभाग निहाय प्रस्तावावर सर्वानुमते चर्चा करून सभेने मंजुरी दिली. विविध कामांत स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत सहभाग, घनकचरा व्यवस्थापन, निधी मागणी प्रस्ताव, रस्ते विकास, एल.ई.डी.पथदिवे विकास कामे, पथ विक्रेत्यांचे सर्व्हेक्षण, ओळखपत्र वाटप, बचत गटांना प्रमाणपत्र वाटप, जलवाहिन्यांवर नळजोड, वाहनतळ तसेच बाजार शुल्क वसुली निविदा आदींवर देण्यात आली. आळंदीला स्वच्छ सर्व्हेक्षण तीन स्टार मानांकन करण्यास मंजुरी, वाहतूक नियंत्रक दिवे, स्वागत कमानी विकास, वृक्ष प्राधिकरण समिती अशा विविध विकास कामना मंजुरी या सभेत देण्यात आली.