सावदा । जिल्ह्यातील बहुअंगी व्यक्तिमत्व म्हणजे सावदा येथील पत्रकारिता व राजकारणातील पितामह स्व. गजाननराव वानखडे अर्थात सर्वांचे लाडके गजाभाऊ होय, त्यांनी पत्रकारिता, राजकीय तसेच समाजिक जीवनासोबत संसारिक व्यापात राहून समाजसेवा कशी करावी याचे एक उत्कृष्ठ उदाहरण समजासमोर ठेवले आहे, त्यांचा जन्म, सावदा येथे 15 डिसेंबर 1941 मध्ये झाला. घरातच समाजसेवेची शिकवण त्यांचे अंगवळणी पडली होती शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचा कल हा पत्रकारीतेकडे होता आपला पारंपारिक सराफी व्यवसाय सांभाळून त्यांनी दै. जनशक्तीसह त्याकाळी नावजलेल्या वृत्तपत्रात काम केले.
वृत्तपत्रातून राजकारणाकडे सक्रिय प्रवास
पत्रकारिता करत असताना गजाननरावांचा स्वभाव, समाजसेवी वृत्ती पाहून त्यावेळच्या जाणकार पुढार्यांनी त्यांच्यातील हेच गुण ओळखून त्यांना राजकारणात आणले, येथे देखील त्यांनी आपल्या कार्यकर्तृवाची छाप पाडली. त्यांच्या पावलावर पाउल ठेवीत पत्नी ताराबाई वानखेडे यानी सन 2001 मध्ये झालेली लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविली व ती जिंकून सावदा येथील प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा होण्याचा बहुमान मिळविला होता, त्यांचे पुत्र राजेश वानखेडे यांनी देखील आपल्या कार्याची सुरवात वृत्तपत्र माध्यमातून केली. त्यानंतर राजकारणात सक्रीय झाले व त्यांनी देखील नगराध्यक्षपद भूषविले व सध्या ते पालिकेत विद्यमान नगरसेवक आहेत.
भावी पिढीस प्रेरणादायी कार्य
सन 2011 ते 2016 दरम्यान याच कुटुंबातील आई, मुलगा, व सून हे तीन जण एकाच वेळी पालिकेत नगरसेवकपदी विराजमान होते व याच काळात राजेश वानखेडे यांनी नगराध्यक्षपद देखील अडीच वर्ष उपभोगले आहे. गजाननराव वानखेडे यांच्यासारखे समाजसेवी वक्तीमत्व, पत्रकारिता व राजकारणातील पितामह आपले अजोड कार्य समाजासाठी मागे ठेवत 3 ऑगस्ट 2016 रोजी अनंतात विलीन झाले, त्यास वर्षपूर्ण होत असून त्यांचे स्मृतीस उजाळा देत असताना त्यांचे कार्य मात्र सदोदित येणार्या पिढीस प्रेरणा देत राहणार आहे.