हंजीर बायेटेककडून मनपाची नुकसान भरपाईची माणगी

0

जळगाव । महानगर पलिकेने हंजीर बायोटेक या मक्तेदाराला घनकचरा प्रकल्प चालविण्यासाठी दिला होता. परंतु, मक्तेदाराने अचानक आपला प्रकल्प बंद केला होता. हा प्रकल्प पुन्हा सुरू करावायासाठी मनपा प्रशानाने प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांना मक्तेदाराने कोणाताही प्रतिसाद दिला नाही. प्रकल्पाला संबंधी अधिक चर्चेंसदर्भांत 23 नोव्हेंबर 2016ला हंजीर बायोटेकचे मालक किंवा त्यांच्या प्रतिनिधींना महापालिकेने आपली बाजु मांडण्यास बोलविले होते. मात्र, हंजीर बायोटेकचे प्रतिनिधी गैरहजर राहिले होते. तर 30 डिसेंबर 2016ला मक्तेदारांनी पुढील सुनावणीत युक्तीवाद करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, आज मक्तेदारांच्या प्रतिनिधींनी घुमजाव करत लवादाची मागणीच केली नव्हती अशी भूमिका घेतली.

मक्तेदाराच्या प्रतिनिधीनीं लवादक मान्य नसल्याचा केला युक्तीवाद
महापालिकेने 2007 मध्ये हंजीर बायोटेक या कंपनीला जळगाव शहरातील कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचा मक्ता दिला होता. यासाठी आव्हाणे शिवारातील 6 हेक्टर 53 आर जागा जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळवून घनकचरा प्रकल्पासाठी या कंपनीला मनपाने दिली होती. जुलै 2013 मध्ये या मक्तेदाराने येथील काम अचानक बंद केले होते. यासंदर्भात महापलिकेने वारंवार बाजु मांडण्यांची संधी देवून आपली बाजू मांडली नसल्याने लवादकासमोर मंगळवार 17 जानेवारीला सुनावणी झाली. यावेळी हंजीर बायोटेकचे वकील मुंदडा व प्रतिनिधी देशपांडे उपस्थित होते. तर मनपाचे वकील केतन ढाके, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील उपस्थित होते.
हंजीर बायोटेक यांनी दोन वेळा महापालिकेकडे लवादक नेमण्याची मागणी केली होती. यामागणीनुसार व हंजीर बायोटेकने मनपाशी केलेल्या करारात आयुक्त हे लवादक म्हणून काम पाहतील असी अट असतांना हंजीर बायोटेकच्या प्रतिनिधींनी आम्ही लवादक मागितला नव्हाता असा युक्तीवाद केला. यावेळी मनपाच्या वकीलांनी मक्तेदाराने लवाद नेमण्याची केलेली मागणी संदर्भांतील कागदपत्रे सादर केली. यासुनावणीत मक्तेदारांचे व मनपाचे म्हणणे लवादक यांनी ऐकून घेतले. मक्तेदाराने काम बंद केल्याने मनपाचे आर्थिक नुकसान झाल्याने मक्तेदराने नुकसान भरपाई देण्याची मागणी मनपातर्फे करण्यात आली आहे.