हंबर्डी । जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम नुकताच सादर करण्यात आला. कार्यक्रमात शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सोबत काही हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. कार्यक्रमात वृक्षारोपण, अंधश्रध्देवर आधारित नाटके, भारुड, लावणी, रेकॉर्ड डान्सही होेतेे. सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय छान नृत्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच किशोर पाटील होेते.
यांची होती उपस्थिती
ग्रामपंचायत सदस्य राजू तायडे, बाली मेढे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुपडू सोनवणे, सर्व सदस्य, मातापालक, शिक्षकपालक संघ सदस्य व शिक्षणप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका दुर्गा केदारे, उपशिक्षक दिपक वारके, ग्रामस्थ विलास तायडे, दिपक मेढे आदींनी परिश्रम घेतले. दिपक कुरकुरे व चंद्रशेखर पाटील यांचे सहकार्य लाभले.