हक्कासाठी महिलांचा साक्रीत एल्गार

0

साक्री । महिलांना 33 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे व निराधार महिलांना वेळेवर मदत दिली गेली पाहिजे अशा विविध मागण्यासाठी धुळे जिल्हा काँग्रेस पार्टिच्यावतीने साक्री तहसील कार्यालयासमोर स्वाक्षरी मोहिम राबविन्यात आली व विविध मागण्यासाठी तहसीलदाराना निवेदन देण्यात आले यावेळी महिलांचा जमाव लक्षणीय होता.धुळे जिल्ह्या काँग्रेस पार्टीचा महिला अध्यक्षा गायत्री जैसवाल व तालुका अध्यक्ष रोशनबी पिंजारी यांचा नेतृत्त्वाखाली ही स्वाक्षरी मोहिंम व विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात
आले.

महिलांची स्वाक्षरी मोहीम
एकीकड़े महिलांना आरक्षण दिल जात आहे आणि दूसरीकड़े महिलांवर होणारे अत्याचार देखील वाढत आहे. याबाबत सरकार लक्ष देईल का ? व समाजात महिलांना आदर व सन्मान कधी मिळेल यासाठी धुळे जिल्हा काँग्रेस पार्टिच्या वतीने महिलांची स्वाक्षरी मोहिम राबविन्यात आली. रेशन कार्ड,मतदान कार्ड,निराधार महिलांचे मानधन,अशा विविध मागण्यासाठी तहसीलदाराना निवेदन देण्यात आले. यावेळी काही महिलांना आपला रोष देखील व्यक्त केला होता. याबाबत धुळे जिल्हा काँग्रेस पार्टिच्या महिला अध्यक्षा गायत्री जैसवाल यांनी माहिती दिली.