वरणगाव। पालिकेने हगणदारीमुक्तीसाठी कंबर कसली आहे. त्यानुसार सार्वजनिक शौचालयासोबतच सोयीयुक्त मॉडर्न शौचालयाच्या बांधकामावर पालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही अशा कुटुंबासाठी मॉडर्न शौचालय उभारत शहर लवकरच हगणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. या शौचालयाची पहाणी नगराध्यक्षा अरुणा इंगळे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केली.
तीन टप्प्यात लक्ष पुर्ण करण्याचे नियोजन
शासनाच्या आदेशानुसार वरणगाव शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने तीन टप्प्यात हे लक्ष पुर्ण करण्याचे नियोजन केले. यानुसार पहिल्या टप्प्यात वैयक्ती शौचालय नसलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण करून अनुदानावर शौचालय बांधणो, उघड्यावर बसणार्या कुटुंब प्रमुखाकडून जागेवरच शौचालय बांधण्यासाठीचा अर्ज भरून घेणो, जागा नसलेल्या कुटुंबासाठी सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करणो. यानुसार आधुनिक पध्दतीचे शौचालाय बाधुन त्या शौचालयाचे देखभाल दुरूस्तीसाठी संस्थेकडे देणो. यानुसार प्रभाग क्रमांक 1, 3, 8, 14 मधे मॉडर्न शौचालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. या शौचालयामध्ये पुरेशा सुविधा व स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष दिले जाणार आहे. चारही शौचालयामधे पुरूषासाठी व स्त्रीयांसाठी स्वतंत्र दहा सीट असणार आहे.
असे होणार बांधकाम
चार मॉडर्न शौचालयाचे काम पुर्ण झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 13 मधील साप्ताहीक आठवडे बाजारात येणार्या नागरीकांच्या सुविधेसाठी आठवडे बाजारात व गट क्रमांक 419 मधे देखील मॉडर्न शौचालय बांधण्यात येणार आहे. तसेच सिध्देश्वरनगर येथे 2 जागेवर व आंबेडकर नगराजवळ साध्या पध्दतीचे दहा सिटीचे शौचालयाच्या उभारण्यात येणार आहे.
600 शौचालयाचे बांधकाम पूर्ण होऊन वापर सुरु
शहरात 950 वैयक्तीक शौचालयाचे अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी 600 शौचालय बांधुन वापर सुरू झाला आहे. तर साडेतीनशे शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. या व्यतिरीक्त आणखी वैयक्तीक शौचालयाची मागणी केली जात आहे. आलेल्या प्रत्येक अर्जाची पाहणी करून जागेचे सर्वेक्षण करुन तात्काळ अनुदान व बांधण्या बाबतची परवानगी दिला जात आहे. शहरात विविध विकास कामे होत आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून शहर हगणदारी मुक्त करण्यावर पालिकेचा भर होता. त्यानुसार जवळपास शंभर टक्के हगणदारी मुक्त शहर होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी पालीकेचे सर्व नगरसेवक, कर्मचारी यांनी मनापासून काम केले व त्याला नागरीकांची साथ मिळाल्याने हे काम शक्य होत असल्याचे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले.