मुंबई । विरुष्काला लग्नाच्या शुभेच्छा देताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने अनुष्काला आडनाव न बदलण्याचा सल्ला दिला होता. विराट कोहलीने रोहितच्या या सल्ल्यावर ट्वीटरच्या माध्यमातून मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्माने 12 डिसेंबरला विराट कोहली आणि अनुष्का शर्माला लग्नाच्या शुभेच्छा देताना ट्विट केले होते की, विराट मी तुला हजबंड हँडबुक देईन आणि अनुष्का तू आडनाव बदलू नकोस’. रोहितचेही आडनाव शर्मा असल्याने अनुष्कालाही शर्मा हे नाव बदलू नकोस असा सल्ला त्याने गंमतीत दिला होता. रोहित शर्माच्या या ट्वीटला आता विराटनेही गंमतीशीर उत्तर दिले आहे. रोहित मला तुझ्या हडबंड हँडबुक सोबत तुझे ‘डबल हंड्रेड’ हँडबुकही दे, असे मजेशीर उत्तर दिले आहे.
अनुष्काने मानले आभार!
विराट आणि अनुष्काने 11 डिसेंबरला इटलीमध्ये लग्न केले होते. त्यानंतर या दोघांना अनेक क्रिकेटपटूंनी आणि टीम इंडियातील सहकार्यांनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी रोहित शर्मा याने केलेले एक मजेशीर ट्वीट चांगलेच गाजले होते. रोहितने नवदाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छा देताना भावी आयुष्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. ‘विराट मी तुला हजबंड हँडबुक देईन. अनुष्का तुझे आडनाव बदलू नकोस, असे रोहितने या ट्वीटमध्ये म्हटले होते. अनुष्का शर्माने दोन दिवसांनंतर रोहितच्या ट्वीटचे उत्तर दिले होते. हाहाहा धन्यवाद रोहित. जबरदस्त खेळीसाठी अभिनंदन’!
विराटचे गंमतीशीर उत्तर
रोहित शर्माच्या या ट्वहटला आता विराटनेही गंमतीशीर उत्तर दिले आहे. त्याने म्हटले की, रोहित मला तुझ्या हडबंड हँडबुक सोबत तुझे ‘डबल हंड्रेड’ हँडबुकही दे. रोहित शर्माने काही दिवसांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात कारकीर्दीतील तिसरे द्विशतक झळकावले होते. आपल्या या कामगिरीमुळे रोहितने क्रिकेटविश्वात नवा विक्रम प्रस्थापित केला होता. त्यामुळेच विराटने आपल्या ट्वीटमध्ये रोहितला ‘डबल हंड्रेड’ हँडबुक द्यायला सांगितले आहे.