‘हजरत बिलाल’तर्फे चिमुलकल्यांना इफ्तार

0

जळगाव। रमजान महिन्यातील ’14 वा रोजा छोटा खतम का’ या रोजाचे महत्त्व मोठे आहे. शिवाजीनगर येथे दरवर्षाप्रमाणे मदरसा हजरत बिलाल रजि.च्या चिमुकल्यांनी रोजा केल्याने शनिवार 10 रोजी 3 व 4 वयाच्या चिमुकल्यांना रोजा इफ्तार पार्टी देण्यात आली.

चिमुकल्यांनी खाऊंचे वाटप करण्यात आले. अन्वीरा परवेज वय 3, नदीम पटेल 4, सै.अब्दुला 3, हमजा असिफ शाह 3 यांच्यासह 50 विद्यार्थी, विद्यार्थींनीने रोजा केले. सर्वांना फलहार देऊन त्यांचे स्वागत मदरसा हजरत बिलाल रजि.चे अध्यक्ष सैय्यद अकील यांनी केले. शिक्षका अलमा शगुफता, आलमा मजिबुन्नींसा, नसीम बानो यांचे ही मानधन देऊन सत्कार करण्यात आले. सतत 12 वर्षांपासून मदरसामध्ये मोफत सामाजिक शिक्षण देत असल्याने अ‍ॅड.सलीम शेख यांनी संस्थाचे कौतुक केले.