हजरत बिलाल बहुउद्देशिय संस्थेतर्फे गो-सेवा

0

जळगाव। मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सध्या सुरु आहे. रमजान निमित्त मुस्लिम समाजबांधव विविध उपक्रम राबवित आहे. हजरत बिलाल बहुउद्देशिय संस्थेतर्फे मंगळवारी 6 रोजी शहरातील नेरी नाका परिसरात असलेल्या पांझरापोळ गो-शाळेतील गायींची सेवा केली.

संस्थेतर्फे गायींना हिरवा चार खाऊ घालण्यात आले. यावेळी अ‍ॅड.विजय काबरा, अ‍ॅड.सलीम शेख, अखिल शेख आदींसह मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.