माजी आ. आर ओ पाटील यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
पाचोरा – पाचोरा येथील माजी आमदार तथा निर्मल सिड्सचे कार्यकारी संचालक आर. ओ. तात्या पाटील, यांचे निधनाने राजकीय, सामाजिक, व कृषी शेत्राची मोठी हानी झाली असून खानदेशातील द्रष्ट नेता, अजात शत्रू, शेतकर्यांचा कैवारी व हजारोंचा पोशिंदा हरविल्याची शोकसंवेदना विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकार्यांनी व्यक्त केली. यावेळी, संजय सावंत, संजय वाघ, साहेबराव पाटील, खलील देशमुख, नितीन तावडे, मुख्तयारसिंह सुर्यवंशी, सुनील सराफ, डॉ अनिल देशमुख, डॉ रुपेश पाटील, शेख रसुल शेख उस्मान, शांताराम सोनजी पाटील, मधूकर काटे, डॉ अस्मिता पाटील, प्रा. सुनील पाटील, सदाशिव पाटील यांनी व्यक्त केली. तसेच खलिल देशमुख, डॉ. रुपेश पाटील, सुनील सराफ, प्रा. सुनिल पाटील, डॉ. अनिल देशमुख, सभापती बन्सीलाल पाटील, माजी सभापती सुभाष पाटील, प्रा. डॉ. बी. एन. पाटील,उद्योजक संजय कुमावत, राजु पाटील, शरद पाटील, कमलताई पाटील, वैशाली सुर्यवंशी, तिलोत्तमा मौर्य, वंदना पाटील, प्रकाश सोमवंशी, किशोर बारावकर, अशोक संघवी, सुनिल शिंदे, हिम्मतसिंग निकुंभ, अजहर खान, नगरसेवक वाल्मिक पाटील, आनंद पगारे, महेश सोमवंशी, सचिन सोमवंशी, राष्ट्रवादीचे संजय वाघ, आ. किशोर पाटील, भाजपाचे सतीश शिंदे, सदाशिव पाटील उपस्थित होते.