जळगाव- जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठभ गांधी जयंतीनिमित्त २ आॅक्टोंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थ शिवनेरी ते मंत्रालयापर्यंत पायी पेंन्शन दिंडी काढण्यात येणार आहे़ या दिंडीत जळगाव जिल्ह्यातील ३ हजार कर्मचारी सहभाग होणार आहे़ याबाबत नुकतेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनतर्फे उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे़
शासनाने १ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर नियुक्त होणाºया कर्मचाºयांना निवृत्ती वेतन योजना बंद करून पारिभाषिक अंशदायी पेंशन योजना सुरू केली़ मात्र, योजनमुळे कर्मचाºयांचे सेवानिवृत्ती नंतरचे भविष्य असुरक्षित झाले़ त्यामुळे या नव्या पेंशन योजनेविषयी राज्यात लाखो कर्मचाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. म्हणून आता कर्मचाºयांना त्वरीत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी पायी पेन्शन दिंडी काढण्यात येणार आहे़ त्या संदर्भात निवेदन देण्यात आले असून यावेळी संघटनचे जिल्हाध्यक्ष गोविंदा पाटील, राज्यप्रतिनिधी मुजीब रहमान ,जिल्हा सल्लागार नाना पाटील, जिल्हा संघटक विपीन पाटील, महेंद्र देवरे,जिल्हा कोषाध्यक्ष राकेश पाटील व प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते.