हजारो लॉटरी व्यावसायिकांचा आझाद मैदानात हल्लाबोल

0

मुंबई । महाराष्ट्रातल्या ऑनलाईन लॉटरी व्यवसायातील भागीदारांची संघटना असलेल्या लॉटरी बचाव महाकृती समितीने केंद्र सरकारकडे लॉटरी व्यवसायाला जीएसटीच्या 28 टक्के ब्रॅकेटमधून सवलत मिळावी, यासाठी याचिका दाखल केली आहे. राज्यभरातील लॉटर व्यापारातील भागीदार आणि मालक एकाच संघटनेच्या नावाने आपली समस्या मांडण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी आझाद मैदान येथे एकत्र आले होते.28 टक्क्यांच्या जीएसटीतील फरकामुळे ‘एक राष्ट्र एक कर’ या तत्वालाच धक्का पोहोचला असून यामुळे देशभरात एकसमान करप्रणाली रुजवण्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. खासगी लॉटरी व्यावसायिकांना 28 टक्के जीएसटी भरावा लागत असला, तरीही यात भेदभाव करत सरकारी लॉटरीधारकांना मात्र केवळ 12 टक्के जीएसटी भरावा लागत असल्याने, खासगी व्यावसायिकांमध्ये याबाबत नाराजी पसरली आहे.