पिंपरी-चिंचवड : सौदी अरेबिया येथील मक्का मदिना या पवित्र ठिकाणी धार्मिक कार्यासाठी जाणार्या हज यात्रेकरुंचा नेहरुनगरात सत्कार करण्यात आला. माजी महापौर हनुमंतराव भोसले यांच्या हस्ते यात्रेकरुंचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना सुरक्षित यात्रेकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती
माजी महापौर हनुमंतराव भोसले, नगरसेवक राहुल भोसले, नेहरुनगरातील तवकल्ला जामा मशिदीचे अध्यक्ष हाजी नजीर तराजगार, हाजी अमीर सय्यद, हाजी नईम बादशहा, हाजी उस्मान गणी शेख, हाजी शफी देशनूर, हाजी नजीर शेख, हाजी युसूफ इद्रीस, दस्तगीर तराजगार, सलीम शेख, हाजी अब्दुल रशीद पिरजादे, हाजी हारून शेख, गुलाम शहा, निसार दारुवाला, हाजी अब्दुल रशीद खलिफे आदी उपस्थित होते.