हज यात्रेकरूंसाठी लसीकरण

0

पुणे : महापालिकेचा आरोग्य विभाग व हज कमिटीच्या वतीने हज यात्रेकरूंसाठी मेंदूज्वर, पोलिओ, एचवनएनवन वर लसीकरण मोहीम नुकतीच राबविण्यात आली. या लसीकरण मोहिमेअंर्तगत एकूण 1640 हज यात्रेकरूंचे लसीकरण करण्यात आले. या मोहिमेमध्ये हज कमिटीचे सदस्य अ‍ॅड. सलीम शेख व त्यांच्या सहकार्‍यांनी मदत केली. आरोग्य विभागातील सहआरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांच्या मार्गदर्शनात 10 वैद्यकीय अधिकारी, 28 परिचारिका व 12 कर्मचार्‍यांनी मोहीम पार पाडली.