हज यात्रेकरू मुस्लिम बांधवांचा सत्कार

0

हज यात्रा सुखाची होवो- आमदार किशोर पाटील

पाचोरा(प्रतिनिधी) – पाचोरा शहर व तालुक्यातील पवित्र हज यात्रेकरू मुस्लिम बांधवांचा सत्कार सोहळा आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. हज यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी छोटेखानी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमात आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते महेबूब करामन बागवान, शेख इसाक शेख, वजीर मन्यार शेख रज्जाक शेख अब्दुल रहमान मन्यार, शेख रफिक मुसा, शहीद रफिक साहब यांचा सत्कार करण्यात आला.
मुस्लिम समाज बांधवांसाठी हजयात्रेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मक्का मदीना अल्लाचे पवित्र ठिकाण आहे. आपण मक्का मदीनालाला जाऊन अल्लाचे दर्शन घ्या व आपल्या गावासाठी, राज्यासाठी, देशासाठी परमेश्वराला देशात सुख, शांती, समृद्धी नांदो अशी प्रार्थना करा. आपण सारे हिंदू- मुस्लिम बांधव अंत्यत गुण्यागोविंदाने एकोप्याने राहत आहेत. हजयात्रा सुखाची समाधानाची होवो. आपले आरोग्य निरोगी राहो. आपल्या हातातून देशाची सेवा घडो असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. यावेळी मौलाना अमजद खान यांनी हजयात्रेचे महत्व सांगितले व नाना वाघ यांनी संचालन केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी रावसाहेब पाटील, गणेश पाटील, दिनकर देवरे, उद्धव मराठे, शरद पाटील, अविनाश कुडे, रहमान तडवी, गंगाराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भैय्या महाजन, किशोर बारावकर, मतीन बागवान, भरत खंडेलवाल, शाकीर बागवान, इसा खान, जावेद शेख, अब्दुल गणी, आरिफ भाई, ठेकेदार सिकंदर तडवी, वसीम शेख इमाम शेख, निसार पिंजारी, अन्वर टाकारी, अखिल मिर्झा, दिनकर गीते, संदीप राजे, भैय्या देवरे, दत्तू कुमावत, कैलास पाटील, मधु बारी, अनिकेत सुर्यवंशी, अण्णा चौधरी,निखिल भोई, मयूर महाजन, बापू सोनवणे, दीपक पाटील, वैभव राजपूत,नितीन पाटील, विजय भोई आदी मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मतीन बागवान शाकिर बागवान, जावेद शेख तथा अल्पसंख्यांक आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले.