सौदी अरेबियातील मक्का येथे हज यात्रेसाठी यंदा जगभरातून 20 लाख भाविक जमा झाले असून यंदा इराणचे नागरिकही या यात्रेसाठी आले आहेत. गतवर्षी इराणमधून एकही भाविक या यात्रेसाठी आलेला नव्हता.
मुस्लीम समाजात आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी अशी श्रद्धा आहे. या यात्रेत 2015 साली प्रचंड चेंगराचेंगरी होऊन माजलेल्या अफरातफरीत 2300 जण ठार झाले होते व त्यात इराणच्या 464 नागरिकांचा समावेश होता. त्यावरून इराणने सौदी सरकारवर आरोप करताना जाणूनबुजून हा अपघात होऊ दिल्याचा दावा केला हेाता. त्यामुळे दोन्ही देशातील राजकीय संबंधही बिघडले होते.यंदा मात्र पुन्हा एकदा इराणचे भाविक हज यात्रेसाठी आले असून या यात्रेत मुस्लीमबहुल असलेल्या इंडोनेशियाचे सर्वाधिक यात्रेकरू आहेत.