हडपसर । शाळेत शिक्षण असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक आंदोलन करत असताना दुसरा नगरसेवक मात्र उपस्थित असूनही सहभागी नसल्याची घटना हडपसरमध्ये बघायला मिळाली. या दोन्ही नगरसेवकांनी एकमेकांवर धूळफेक केली असून विरोधी पक्षनेते यांनी मात्र असा क ाही वाद नसल्याची सारवासारव केली आहे.
सकाळी 7 वाजता महापालिकेच्या कै. रामचंद्र बनकर शाळेमध्ये पालकांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात आली. नगरसेवक योगेश ससाणे यांनी शालेय गणवेश घालून लक्ष वेधले. त्याचवेळी माजी महापौर आणि स्थानिक नगरसेविका वैशाली बनकर याही तिथे उपस्थित होत्या. मात्र त्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याऐवजी पालकांशी चर्चा करण्याचा मार्ग स्वीकारला. त्यातच या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची तक्रार वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांकडे केल्याची चर्चा आहे. मात्र असे काहीही झाले नसून त्यांच्यात कोणताही विसंवाद नसल्याचे तुपे यांनी सांगून घडल्या प्रकारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला.
महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या बनकर शाळेमध्ये सुमारे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, शाळेमध्ये एकूण 54 वर्ग खोल्या असून त्यापैकी फक्त 27 वर्ग खोल्या चालू आहेत मात्र केवळ 15 शिक्षक आहेत. पुणे महानगर पालिकेच्या सर्वात अद्ययावत असलेल्या या बनकर शाळेत सर्व सोयी जसे की ग्रंथालय, सायन्स लॅब, एरोमॉडलिंग, संगणक लॅब, संगीत रूम, तसेच अडोटोरिअम, जिम, बॅडमिंटन हॉल, स्नोकरहॉल, स्विमिंग टँक आणि टेबल टेनिसआहेत. शिक्षकांअभावी या सुविधा धूळ खात पडलेल्या आहेत. यावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हडपसर ससाणे यांनी मुलांसारखा शालेय गणवेश परिधान करून पालकांच्या सह्यांची मोहीम राबविली होती. नगरसेवक महेंद्र पठारे यांनी ही खराडी भागातील पालिकेच्या शाळेमधील असुविधांसाठी या सह्यांच्या मोहमेस उपस्थित राहून पाठिंबा दिला.
वेगळं भासवण्याचाप्रयत्नकरू नये
या बाबतीत कोणीही राजकीय स्टंटबाजी करू नये अशी टीका बनकर यांनी ससाणे यांचेनाव न घेता केली आहे. लोकप्रतिनिधींना 1 लाख लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पकांसमोर काही वेगळं भासवण्याचा प्रयत्न करू नये असे मत ही त्यांनी व्यक्त केले. मी देखील अतिरिक्त आयुक्तांशी बोलून या विषयाचा मागोवाघेतआहे.
शाळा महापालिकेची : खासगीनाही
प्रत्येक विद्यार्थ्यालावस्तू मिळावी ही माझी इच्छा आहे. शिक्षणाच्या भरतीची प्रक्रिया लवकर सुरू होणे गरजेचे होते. मुळात शाळांना कोणाच्या पूर्वजांवरून नवे देणे चुकीचे असून मी विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केले. शाळा महापालिकेच्या आहेत खासगी नाही अशा शब्दांत त्यांनी बँकर यांनी टोलाल गावला.
विरोधी पक्षनेत्यांची शाब्दिक कसरत
बेब नाव असा काहीही झालेला नाही. दोन्ही नगरसेवकांची शिक्षक भरती व्हावी हीच मागणी आहे. त्यांच्यात कोणताही विसंवाद नसल्याचे सांगत विरोधी पक्षनेते तुपे यांनी शाब्दिक कसरत करत वेळ मारून नेली. दोन्ही नगरसेवक एकत्र काम करत आहेत, असे ही ते म्हणाले.