हडपसर । साहित्य सम्राट पुणेतर्फे लोहिया उद्यानात 84 वे मासिक कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ सिने-नाट्य कलावंत जनाबापू पुणेकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन उत्साही वातावरणात संपन्न झाले.
या वेळी उद्यानात पावसाच्या साक्षीने दत्तमंदिरात रंगलेल्या या काव्य मैफलीत कवी आणि रसिकांनी काव्याचा मनमुरादपणे आस्वाद घेतला. या संमेलनात पाऊस, पक्षी, नदी, प्रेम, सखी, दुसरे प्रेम अशा विनोदी काव्यांबरोबर शेतकरी आत्महत्या, भ्रूणहत्या, नशीब इत्यादी सामाजिक जाणिवांच्या काव्यही सादर झाले. झेंडा, पक्ष, राजकारण, सत्ता आणि दारू याकडे झुकलेल्या तरुणांना सकारात्मक दिशा देण्याची गरज असलेल्या कवितांनी उत्स्फूर्त दाद मिळवली.
काव्य मैफलीत ज्येष्ठ कवी शिवाजी उराडे, विनोद अष्टुळ,जनाबापू पुणेकर,सुभाष बडदे महाराज, राहुल अडसूळ, नानाभाऊ माळी, अंकुश जगताप, गौरव नेवसे, सुर्यकांत नामुगडे, किशोर टिळेकर, पंडित तुपे, ऋषीकेश राजगुरू आणि विकास बर्डे पंधरा कवींनी सहभाग घेतला
संमेलनाचे सूत्रसंचालन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी केले. आभार सूर्यकांत नामुगडे यांनी मानले.