हडपसरमध्ये विविध स्पर्धांसह सामाजिक उपक्रमही

0

हडपसर । महादेवनगर येथील अखिल महादेवनगर युवा मंचचे हे आठवे वर्ष असून मंडळाने ‘लालबागच्या राजा’ची प्रतिकृती साकारली आहे. दहा दिवस मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले असून नृत्य व पाककला स्पर्धा तसेच बालमहोत्सवाचे आयोजन केले आहे. प्रशांत घुले मंडळाचे अध्यक्ष आहेत. गणेश घुले, संदीप भांगे, अजिंक्य रोमण, अमोल उबाळे, अभय कुंजीर, प्रतिक कुळे, रोहन भंडारी, अतुल कामठे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले आहेत.

उदय मित्र मंडळानेही साध्या पद्धतीने गणेशाची स्थापना केली आहे. मंडळाने ‘बेटी बचाओ’, गरीब शालेय विद्यार्थ्यांना मदत असे उपक्रम राबविले आहेत. सुनील घुले, धनंजय शिंगोटे, अध्यक्ष कुलदीप यादव, गणेश कोतवाल, किशोर गायकवाड, दिनेश इंगळे, योगेश भोसले, विनय भापकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी संयोजन केले आहे.

नवरंग मंडळाचे गणेशमंदिर
महादेवनगर येथील नवरंग कला व क्रिडा मंडळाने कायमस्वरूपी गणेश मंदीर उभारले आहे. रविंद्र गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. गणेश, नवक्रांती, शिवराज प्रतिष्ठान, बाप्पा मोरया प्रतिष्ठान, रॉयल ग्रुप, भिमज्योत, जनकल्याण युवा मंच, समता दीप ज्योत, युथ क्लब, शिवशाही प्रतिष्ठान, अण्णासाहेब मगर कॉलेज, आदर्श, जयहिंद आदी मित्रमंडळांचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने परंतु उत्साहात साजरा केला जात आहे. गोपाळपट्टी येथील नवज्योत कला क्रिडा मित्र मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. मंडळाचे हे 35वे वर्ष आहे. होम मिनिस्टर, बालमहोत्सव, कीर्तन व महाप्रसाद अशा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मंडळाचे संतोष टकले, अध्यक्ष उमेश माळी, सौरभ आतकर, अक्षय काळे, शुभम टकले, अक्षय काकडे, दिगंबर घुले, आकाश काकडे, राहुल कावळे, कार्तिक टकले, मेघराज शिंदे आदी कार्यकर्ते उत्सवात परिश्रम घेत आहेत.

शिवशक्ती मित्र मंडळासह शिवरत्न, अष्टविनायक, लक्ष्मीमाता, हनुमान, महात्मा फुले, शिवचैतन्य, सुवर्णयुग, जय गणेश, शिवशंभो, शिवराज, राजे क्लब आदी छोट्या-मोठ्या मंडळांनीही साध्या पद्धतीने मात्र उत्साहात गणेशोत्सवाचे संयोजन केले आहे. नवनिर्माण युवा प्रतिष्ठानच्या वतीने विशाल ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चारवाडा रस्त्यावरील शिवशंकर मित्र मंडळ 42वा गणेशोत्सव साजरा करीत आहे. मंडळाला आदर्श उत्सवासाठी तिसर्‍या क्रमांकाचा सुखकर्ता पुरस्कार मिळाला आहे. अमित घुले, दिगंबर घुले, अध्यक्ष समीर घुले, शैलेश घुले, सोमनाथ घुले, मयूर घुले, भाऊसाहेब घुले, सुमीत घुले आदी पदाधिकारी संयोजन करत आहेत.

मांजरी फार्म येथील कानिफनाथ मित्रमंडळाचे गणेशोत्सवाचे हे 35 वे वर्ष आहे. मंडळ वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. मंडळाचे राहुल घुले, प्रदीप घुले, अध्यक्ष कुमोद माने, अथर्व चोरघडे, सादिक मक्तुबंडे, सुदर्शन घुले संयोजन करीत आहेत.मोरे वस्ती येथील शिवनारायण मित्रमंडळाने विद्युत रोषणाई केली आहे. मंडळाचे हे 21 वे वर्ष आहे. सुधीर घुले, अध्यक्ष समीर घुले, सागर घुले, अमित शिवले, गौरीशंकर घुले, अमोल मोरे, समीर मोरे संयोजन करीत आहेत. भापकर मळा येथील शिवप्रतिष्ठान गेली दोन वर्षांपासून वंचित घटकांना मदतीचा हात देत आहे. मंडळाने गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप केले होते. मंडळाचे हे सातवे वर्ष आहे. यावर्षी अपंग, अनाथ व्यक्तींना आवश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत केली जाणार आहे. गणेश भापकर, अध्यक्ष संतोष घुले, योगेश घुले, विकास भापकर, संतोष भापकर परिश्रम घेत आहेत. सोलापूर रोड येथील अजिंक्य मित्र मंडळ 15 वर्षांपासून उत्सव साजरा करीत आहे. शिवराज घुले यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी संयोजन करीत आहेत.

घुलेवस्ती येथील हनुमान मित्र मंडळ, जयमल्हार, गोपाळपट्टी येथील एकता कला व क्रिडा, दीपज्योत, गावठाणातील रामराज्य प्रतिष्ठान व अण्णासाहेब मगर कला व क्रिडा मंडळ यांनीही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अण्णासाहेब मगर मंडळाने संगमरवरामध्ये आकर्षक कायमस्वरूपी मंदिर उभारले आहे. कैलास घुले यांच्यासह पदाधिकारी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. शेवाळवाडी येथील आनंदस्मृती कला व क्रिडा मंडळाचे उत्सवाचे 22 वे वर्ष आहे. मंडळाने दुष्काळग्रस्त कुटुंबांना शिधा वाटप, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत, मुलगी वाचवा अभियान आदी उपक्रम राबविले आहेत. यावर्षी मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस विक्रम शेवाळे, अध्यक्ष अशोक शेवाळे, महेश होले, तात्यासाहेब हाके, किरण शेवाळे, अमोल ढोरे, शिवम शेवाळे यांच्यासह इतर कायकर्त्यांनी उत्सवाचे संयोजन केले आहे.

बेल्हेकर वस्ती येथील विघ्नहर्ता सेवा प्रतिष्ठानने कायमस्वरूपी गणेश मंदिर उभारले आहे. मंडळाचे हे 17 वे वर्ष असून यावर्षी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. राजेंद्र बेल्हेकर व मोहन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. आणाजीवस्ती येथील सुवर्णयुग मित्र मंडळाने फुलांच्या सजावटीत गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. महिला, मुलांसाठी संगीत रजनी, होम मिनिस्टर, जादुचे प्रयोग आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. निलेश घुले, अध्यक्ष राजेंद्र राखपसरे, अतुल घाडगे व पदाधिकारी उत्सवाचे संयोजन करीत आहेत.

साडेसतरानळी येथील मंडळे
साडेसतरानळी परिसरातील साधुनाना वस्ती येथील श्रीकृष्ण मित्र मंडळ, गोसावीवस्ती येथील अखिल गोसावीवस्ती मित्र मंडळ, अखिल साडेसतरानळी मित्रमंडळ, तुपेवाडा येथील साईनाथ मित्रमंडळ, ठाणगे वस्ती येथील हनुमान मित्रमंडळ, सर्व्हे नंबर 3 येथील गणराज मित्रमंडळ, गोसावीवस्ती येथील अश्‍वमेघ मित्रमंडळ, दांगट वस्ती येथील महालक्ष्मी मित्रमंडळ आदी गणेशोत्सव मंडळांनी विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसह स्पर्धांचे आयोजन केले आहे. पदाधिकारी गणेश तुपे, घनःश्याम जगताप, शुभम मदने, मारुती माझिरे यांच्यासह कार्यकर्ते उत्सवाचे संयोजन करीत आहेत. अन्सारी फाटा व ओरिएंट गार्डन येथे कायमस्वरूपी गणेश मंदिर उभारण्यात आले आहे.