हडपसर । हडपसर परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये यावर्षी गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात साजरी झाली. ससाणेनगर परिसरातील सर्वांत जुनी सोसायटी कानिफनाथ सोसायटीत यावर्षी पांरपरिक पोषाख परिधान करत विसर्जन नागरिकांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. गुलालाचा वापर न करता प्रदुषणमुक्त मिरवणूक काढली.
यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. बँडच्या तालावर ठेका धरत फुगड्या, नाचण्याचा आनंद त्यांनी यावेळी घेतला. पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती हे आणखी एक वैशिष्ट्य होते. दहा दिवस विविध सांस्कृतिक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. होम मिनिस्टर, डान्स, लिंबू-चमचासारख्या स्पर्धांमुळे हा सोहळा रंगतदार बनला. स्वप्निल राठी हे अध्यक्ष तर पवन राठी उपाध्यक्ष होते.