हडपसर । हडपसर उपनगरातील काही गणेश मंडळांना 25 तर काही मंडळांना 50 वर्ष पूर्ण झाली आहेत, आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने केलेले धार्मिक देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी वाढू लागली आहे. नोटबंदी व जीएसटीमुळे व्यावसायिक अडचणीत आले आहेत, याचे सावट गणेशोत्सवावर दिसून येत आहे.
विहार मित्र मंडळ
विहार मित्र मंडळालाही पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा केला आहे. देखावा आकर्षक असल्याने तो पाण्यासाठी लांबवरून येथे भाविक येत आहेत. देखाव्याचे उद्घाटन कोल्हापूरचे राजे खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. मंडळ दरवर्षी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करीत आहे.
युथ क्लब मित्र मंडळ
युथ क्लब मित्र मंडळाने गांधी चौकात रंग महालाच्या देखावा केला आहे. दरवर्षी सामाजिक प्रबोधनात मंडळ नेहमी अग्रेसर राहत आहे. गणेशोत्वानिमित्त सुरू केलेले सामाजिक उपक्रम पुढे वर्षभर वेगवेगळ्या निमित्ताने पार पाडले जातात. समाजातील अशा सर्व घटकांनाबरोबर घेऊन त्यांनाही गणेश उसत्वाचा आनंद घेता यावा याच उद्देशाने शिरीष कुमार मित्र मंडळाने या मुलांना प्रवाहात आणण्याचा खारीचा वाटा उचलत मुलांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय सातव, प्रमोद सातव, गणेश बोराटे, आकाश डांगमाळी यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले माळी यांना ‘गुलामगिरी’ पुस्तक व झाड भेट देण्यात आले.
शिरीष कुमार मित्र मंडळ
ससाणेनगर येथील शिरीषकुमार मित्र मंडळाने महापालिका व बॅचपन बचाओ समिती यांच्या हडपसर गाडीतळ येथील बन्टर स्कूल जवळ असलेला ‘घरटं प्रकल्प येथील अनाथ मुले’ अशी मुले जी रस्त्यावर आपले जीवन जगत होती. अशा अनाथ मुलांना जगण्याचा हक्क मिळाला पाहिजे असा विचार हडपसर ससाणेनगर येथील समाज सेवक रतन माळी यांनी केला व पालिका व बचपन बचाओ समिती यांच्या वतीने रतन माळी ही सर्व व्यवस्था पाहतात.
श्री साई प्रतिष्ठान
श्री साई प्रतिष्ठानच्यावतीने आकर्षित देखावा सादर करण्यात आला. मांजरी फाटा 15 नं येथील श्री.गणेश मित्र मंडळाचे यंदा 36 वे वर्ष असून यावर्षीही हलत्या देखाव्याची परंपरा कायम राखली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील तानाजीने यशवंतीचा आधार घेत गड सर केला अन बलिदान दिले स्वराज्यात हा किल्ला आला अन मावळा गमावला राजांनी या किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवले याचा हलता देखावा सादर केला आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष सचिन मोरे, हितेश घाडगे, असून अध्यक्ष आकाश भोजने आहेत देखावा साकारण्यासाठी अमोल मारणे, अमोल पवार यांनी परिश्रम घेतले आहेत.