पाचोरा । हणुमंतखेडा ता.सोयगांव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन निर्घुणपणे खुन करणार्या नराधमांवर कठोर शासन करुन त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. यासाठी निंभोरी (तांडा) ता. पाचोरा येथील जय सेवालाल मित्रमंडळातर्फे पोलिस उपअधिक्षक केशव पातोंड, उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयास निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी कृष्णराव जाधव, गोकुळ राठोड, जगन राठोड, दत्तात्रय राठोड, विजय जाधव, अनिल जाधव, अशोक राठोड, उपस्थित होते.
हनुमंतखेडा प्रकरणाचा केला निषेध
औरंगाबाद जिल्ह्यातील हणुमंतखेडा येथील स्थानीक तीन नराधमांनी 14 रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा खुन केला. कोपर्डी हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली. भविष्यात अशी घटना पुन्हा घळु नये, यासाठी सदरचा खटला फास्ट कोर्टात चालवा व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी. यासाठी निंभोरी तांडा येथील जय सेवालाल मंडळातर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य अनिल जाधव, किशोर नरेराव, ज्येष्ठ नागरिक मोरसिंग जाधव, तेजराव राठोड, ईश्वर जाधव, अर्जुन राठोड, सचिन राठोड, दिनेश राठोड, पंडित राठोड, सुनिल चव्हाण, विलास राठोड, संदिप राठोड, ज्ञानेश्वर राठोड, विनोद राठोड, गणेश राठोड, अरुण राठोड, अनिल राठोड, रामजी राठोड, संजय पवार, शेषराव राठोड यांच्या सह्या आहेत.