लाभक्षेत्रात पाऊस कायम ; तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू
भुसावळ- तापी व पुर्णा नदीच्या उगम क्षेत्रात पाऊस झाल्याने तालुक्यातील हतनूर धरणाचे सहा दरवाजे पूर्णपणे गुरूवारी दुपारी उघडण्यात आले तर आधीपासून चार दरवाजे उघडे असल्याने एकूण दहा दरवाज्यातून तापी नदी पात्रात 181.61 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. प्रशासनाने नदीकिनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही दिवसांपासून तापी व पूर्णा नदीच्या पाणलोट क्षत्रात पावसाचा जोर कायम सुरू असल्याने दोन्ही नद्यांना बर्यापैकी पाणी आले आहे. यामुळे हतनूर धरण प्रशासनाने धरणात येणार्या पाण्याचा अंदाज घेवून धरणाचे गुरूवारी सहा दरवाजे पुर्णपणे उघडल्याने तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने तापी नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांमधील पाण्याची समस्या मार्गी लागण्यास मदत झाली आहे तसेच धरणातून यावल व चोपडा या तालुक्याकडे जाणार्या कालव्यातही पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.