हतनूरचा धरणातून पुढील आठवड्यात विसर्ग होणार बंद

0

भुसावळ- हतनूरच्या पाणलोटक्षेत्रातून होणारी पाण्याची आवक आता कमी झाली आहे. त्यामुळे आठवडाभरात हतनूर धरणातून होणारा विसर्ग बंद केला जाणार आहे. दरम्यान, गेल्या पंधरवड्यापासून एक दरवाजा 22 सेंटीमीटरने उघडून विसर्ग केला जात होता. हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात यंदा परतीचा पाऊस नसल्याने आवक कमी झाली आहे. 100 टक्के साठा पूर्ण करुन पंधरवड्यापासून एक दरवाजा 22 सेंटीमीटरने उघडून विसर्ग केला जात होता. मात्र, आता ती आवक कमी झाली आहे. येत्या आठवडाभरात ही आवक पूर्णपणे बंद होऊन हतनूरमधून होणारा विसर्ग थांबवण्यात येणार आहे. विसर्गामुळे दीपनगर केंद्र, आयुध निर्माण, भुसावळ रेल्वे, नगरपालिका व जळगाव एमआयडीसीच्या बंधार्‍यात सध्या समाधानकारक साठा असून, तो दीड महिने पुरणार आहे.