मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक गावांना दिल्या भेटी
भुसावळ- जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी शुक्रवारी दुपारी हतनूर धरणाला भेट देऊन जलसाठ्याची माहिती घेतली. संबंधित विभागाच्या अधिकार्यांशी त्यांनी सखोल चर्चा करून पावसाळ्यापर्यंत जिल्ह्याला साठा पुरणार असल्याने समाधानही व्यक्त केले. तत्पूर्वी गुरुवारी रात्री मुक्ताईनगर मुक्कामी असलेल्या निंबाळकर यांनी तालुक्यातील श्री क्षेत्र कोथळी देवस्थानासह चांगदेव येथे भेट देऊन दर्शन घेतली तसेच तापी-पूर्णा संगमाची पाहणी केली त्यानंतर बोदवड येथेही भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा दौरा बसणार असल्याचे सांगण्यात आले.