हतनूर जलाशयावर आढळले 120 प्रजातींचे 19 हजारांवर पक्षी

0

खिर्डी । चातक निसर्ग संवर्धन संस्था व वनविभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 15 रोजी खान्देशातील एकमेव आयबीए (महत्त्वपुर्ण पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्र) हतनूर धरण जलाशय जाहीर झालेले आहे. डब्ल्यूइटीएल-एनडी च्या सूचनेप्रमाणे येथे आशियाई पक्षी महागणना होत असुन 120 प्रजातींचे 19 हजारच्यावर पक्षी आढळले. सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आली. यासाठी वनविभागाचे जळगाव येथील उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक जळगाव डी.आर. पाटील, मुक्ताईनगर वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल पी.टी. वराडे, वनसंरक्षक दिपाली जाधव, वरणगाव वनसंरक्षक वानखेडे उपस्थित होते.

धोकाग्रस्त प्रजातीही आढळल्या
ही गणना हतनूरसह परिसरात करण्यात आली. जलाशयावर 120 प्रजातींचे 19 हजारच्यावर पक्षी आढळले. त्यात काही आंतरराष्ट्रीय स्तरावर धोकाग्रस्त जाहीर झालेल्या प्रजातीही होत्या. त्यांच्या संवर्धनासाठी हे जलाशय महत्वपूर्ण पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्र जाहीर
झालेले आहे.

विविध उपकरणांच्या सहाय्याने अभ्यास
कार्यक्रमांतर्गत वार्षीक पक्षीगणना करण्यात येणार असल्याने महाराष्ट्रातील विविध पक्षिमित्र हजर होते. यादरम्यान पक्षीमित्र व वन अधिकारी यांनी नदीपात्रात नाव मध्ये फिरुन दुर्बिण कॅमर्‍याच्या विविध उपकरणांच्या सहाय्याने अभ्यास करण्यात आला.

यांनी केली गणना
चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे पक्षी अभ्यासक अनिल महाजन, संस्थेचे सचिव उदय चौधरी, लक्ष्मीकांत नेवे, मनोज बडगुजर, एस.के. पाटील, संजय पाटील, समीर नेवे, सत्यपलसिंग राजपूत, अतुल चौधरी, विलास महाजन, आशीष चौधरी, बाबा जावळे, रामकृष्ण करांडे, प्रशांत पाटील, संकेत पाटील, हर्षल पाटील, विवेक देसाई, उमेश पाटील, राहुल कुंभार यांसह इतर पक्षीअभ्यासक, पक्षीतज्ञ, पीएच.डी. अभ्यासक विद्यार्थी उपस्थित होते.