हतनूर जलाशयावर प्रजासत्ताक दिनापासून पक्षी निरीक्षण

0

तीन दिवस होणार पक्षी गणना ; पक्षी अभ्यासकांना संपर्काचे आवाहन

खिर्डी : हतनूर जलाशयावर हिवाळ्यात देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर परदेशी पक्षी स्थलांतर करून येत असल्याने या पक्षांचे निरीक्षण व अभ्यास चातक निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे गेल्या काही वर्षांपासून करीत असून प्रजासत्ताक दिनी शनिवार, 26 ते 28 जानेवारी दरम्यान यंदा पक्षी गणना होणार आहे. हतनूर धरण जलाशयाला महत्वपूर्ण पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्र (आय.बी.) हा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. पक्षी निरीक्षण शिबिरासाठी योग्य ते कॅमेरे व आवश्यक तांत्रिक उपकरणांसह धरणाच्या क्षेत्राजवळील चिंचोल येथील यज्ञेश्वर आश्रम येथे भोजन, निवास व्यवस्थेसह अभ्यास शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संस्थाध्यक्ष तथा पक्षी अभ्यासक अनिल महाजन (मो.8806198040), सचिव उदय चौधरी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पक्षी निरीक्षण शिबिरासाठी लक्ष्मीकांत नेवे, विठ्ठल भरगडे, राजपालसिंग राजपूत, सत्यपालसिंग राजपूत, विलास महाजन, अतुल चौधरी, सुरेश ठाकुर, संजय पाटील, प्रशांत पाटील, समीर नेवे, संकेत पाटील आदी परीश्रम घेत आहेत.