भुसावळ- हतनूर धरणाचे आठ दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यात चार दरवाजे पूर्ण तर चार दरवाजे एका मीटरने उघडून प्रतीसेकंद 361.00 क्युमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे रविवारपासूनच विसर्ग कमी करण्यात आला. रविवारी सकाळी 12 तर सायंकाळी 8 दरवाजांतून विसर्ग झाला. धरणात सोमवारी रात्री आठ वाजता 177 दलघमी जलसाठा तर 209. 370 मिटर जलपातळी कायम असल्याचे सूत्रांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.