हतनूर धरणाचे 12 दरवाजे पूर्ण उघडले

0

तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ; तापी नदीला पूर

भुसावळ- जळगाव जिल्ह्याची तहान भागवणार्‍या हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे सातत्याने जलसाठा वाढत असल्याने बुधवारी पहाटे धरणाचे 12 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. गत 24 तासात 307 मिली पाऊस झाला तर बुधवारी सकाळी नऊ ते दुपारी साडेतीन वाजेदरम्यान 51 मिलीमीटर पाऊस झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, तापी व पूर्णा काठच्या रहिवाशांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

हतनूर धरणात 47.60 दलघमी साठा
हतनूरच्या लाभक्षेत्रात झालेल्या विपुल पावसामुळे साठ्यात सातत्याने वाढ होत आहे तर बुधवारी पहाटे 12 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले. धरणातून प्रतीसेकंद 778 क्युमेक्स अर्थात 27 हजार 471 क्युसेस प्रतीसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने तापी नदीला पूर आल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हतनूर धरणाची जलपातळी 209.530 मिटर असून धरणात सध्या 180.60 एकूण व 47.60 दलघमी जलसाठा शिल्लक आहे. हतनूरमधून रविवारपासून विसर्ग सुरू आहे तर बुधवारी विसर्ग तीन पटींनी वाढल्यामुळे आता तापीचे पात्र खळाळले आहे.