ठाणे : जिल्ह्यात मलेरियाखालोखाल प्रमाण असणार्या हत्तीरोग या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत. 26 ते 30 जुलैदरम्यान हत्तीरोग सामूदायिक औषधोपचार मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत हत्तीरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.