हत्तीरोग रोखण्यासाठी परिसरात स्वच्छता ठेवणे गरजेचे

0

नवापूर। उपजिल्हा रुग्णालयात जागतिक हत्तीरोग दिन जिल्हा हिवताप अधिकारी यांचा मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाचे विद्यकीय अधिक्षक डॉ अविनाश मावची यांनी दिप प्रज्वलन करुन केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजीव वळवी,डॉ.किती वसावे,डॉ राज भुसावरे,डॉ अमोल जाधव, तालुका आरोग्य पर्यवेक्षक एन.के.श्रीरंगे, हत्तीरोग पथक चे बी.आर.गावीत.पी.एस.पाडवी आदी उपस्थित होते.

ब्रुग्रीया मलायी नावाच्या परजीवी जंतुमुळे हत्तीरोग
यावेळी रुग्णांना मार्गदर्शन करताना वैद्यकिय अधिक्षक डॉ अविनाश मावची म्हणाले की वुचेरेरीया बँक्रोफटी व ब्रुग्रीया मलायी नावाच्या परजीवी जंतुमुळे हत्तीरोग हा आजार होतो. हे रोगाचे जंतु मनुष्याच्या लसिका संस्थेत राहतात. हत्तीरोगाचा जंतु मनुष्याच्या शरीरामध्ये 4ते 6 वर्षापर्यत राहतो. या कालवधीत तो अतिसुक्ष्म अशा पिलांना जन्म देतो त्यांना मायक्रोफायलेरिया असे म्हणतात. हत्तीरोग जंतुचा प्रसार रोखण्यासाठी एक दिवसीय सामुदायिक डी.ई.सी.गोळया वर्षातुन एकदा अशा 2 वर्षाखालील मुले, गरोदर,स्त्रिया व खुप आजारी रुग्ण यांच्या व्यतिरिक्त जोखीमग्रस्त भागातील सर्वाना सलग 5 वर्षापर्यत देण्यात येतो. हत्तीरोगाच्या रुग्णाला नियमित औषधोपचार उपाययोजना व अंडवृध्दी शस्त्रक्रिया करुन रोगाचा प्रभाव कमी करतात येतो. आपल्या घरा समोर पाणी साचू देऊ नका स्वच्छता ठेवावी, आपला परीसर हा स्वच्छ ठेवा जे करुन डांसाचा प्रादुर्भाव होणार नाही. या कार्यक्रमाचे सुञसंचलन तालुका आरोग्य पर्यवेक्षक एन.के. श्रीरंगे यांनी केले.