न्यायालयाच्या आदेशावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
यावल :- हत्याराचा धाक दाखवत पोलीस हवालदाराने गुरे जप्त करण्याचा दम देत गुराख्याकडून 20 हजार रूपये उकळल्याप्रकरणी यावल पोलिसात हवालदारासह अन्य एका विरूध्द न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार 7 ऑगष्ट 2017 रोजी घडल्यानंतर तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली होती.
सैय्यद हसरत सैय्यद हिफाजत अली (रा.मारूळ, ता.यावल) यांनी न्यायालयात दिलेल्या फिर्यादीनुसार ते दिनांक 7 ऑगस्ट 2017 रोजी सातपुड्याच्या वनात माथेरान भागात 21 गुरे-ढोरे चराईकरीता गेले होते तेव्हा तेथे यावल पोलीस ठाण्यात कर्तव्यास असलेले पोलीस हवालदार युनूस तडवी व सोबत रमेश आगजा पावरा (रा.उसमळी, ता.यावल) हे दोघं सोबत 10 ते 12 जणं घेवुन आले व हवालदार तडवी यांनी गुराखी सै. हसरत अली यांना हत्याराचा धाक दाखवून धमकावलेे व मला 20 हजार रूपयेे दे अन्यथा तुझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून तुझे गुरं- ढोर पोलिसात जमा करेल तेव्हा घाबरलेल्या अवस्थे सै.अली यांनी गावात येवून 20 हजार रूपये हवालदार तडवी यास दिले होते मात्र आपली चूक नसतांना अशा प्रकारे तडवी व त्यांच्या सोबत असलेल्या पावरा यांनी आपल्यावर अन्याय केला म्हणुन सै. अली यांनी न्यायालयात या प्रकरणी फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशाने सोमवारी रात्री उशीरा हवालदार तडवी सह पावरा या दोघांवर आर्म अॅक्ट सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला . तपास पोलीस निरीक्षक डी.के.परदेशी करीत आहे.