भुसावळ- हद्दपार असतानाही आदेशाचे उल्लंघण करीत शहरात वास्तव्य करीत असलेल्या आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी रविवारी दुपारी विठ्ठल मंदिर वॉर्डातून अटक केली. शम्मी प्रल्हाद चावरीया (32, रा.जामनेर रोड, वाल्मीक नगर, 72 खोली, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजाजन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, उमाकांत पाटील, तुषार पाटील, कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली. दरम्यान, आरोपीविरुद्ध चोरी, जबरी चोरी, विनयभंग यासह गंभीर गुन्हे दाखल असून त्यास दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.