हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण करीत मिरवणुकीत सहभाग : पाच जणांविरोधात गुन्हा

Deportation Order ‘Kho’ in Raver : Crime Against Five Persons रावेर :  सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या 63 जणांना 8 व 9 रोजी दोन दिवसांसाठी प्रशासनाने शहरबंदी केली होती मात्र प्रशासनाचे आदेश डावलून शहरात वास्तव्य दिसून आल्याने पाच जणांविरुध्द पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
रावेर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त कायदा-सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी शहरातील 63 जणांना 8 व 9 सप्टेंबरपर्यंत शहर बंदी करण्यात आली होती मात्र संशयीत हर्षल बेलसकर, प्रफुल्ल महाजन, आकाश बिल, पंकज महाजन, विनोद सातव हे गणेश विसर्जन मिरवणुकीत आढळुन आल्याने त्यांच्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.