हद्दपारी आदेशाचे उल्लंघण ; दोघा आरोपींना सहा महिन्यांची शिक्षा

0

भुसावळ- हद्दपारी आदेशाचे उल्लंघण केल्याप्रकरणी दोघा आरोपींना भुसावळ न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा व एक हजारांचा दंड ठोठावला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या हर्षल दत्तात्रय राणे व मधू भरत मधुकर महाजन यांच्याविरुद्ध शहर पोलिसांनी कलम 142 अन्वये खटला दाखल केला होता. भुसावळ न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालल्यानंतर दोघा आरोपींना न्यायालयाने सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा तसेच प्रत्येकी एक हजार रुपये दंड सुनावला. या गुन्ह्यात तत्कालीन तपासाधिकारी फारुक शेख हे होते.