हद्दपार आरोपी चाकूसह जाळ्यात

0
भुसावळ : हद्दपार आरोपी विश्नू परशूराम पथरोड (वय 21, रा. 72 खोली वाल्मिक नगर, भुसावळ) व आशोक सदाशीव कोळी (वय 26, रा.बेघर प्लॉटभाग, वराडसीम, ता. भुसावळ) हे  23 रोजी भुसावळ शहरातीळ खडका चौफूलीजवळ पाणटपरीचे आडोश्यात अंधारात लपून असल्याची माहिती कळताच त्यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई बाजारपेठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग पाटील, प्रशांत चव्हान, उमांकात पाटील, सचिन चौधरी, विकास सातदिवे आदिनी केली. आरोपींकडून चाकू जप्त झाला. भुसावळ बाजारपेट पोलिसात भाग 6 गुरन 3158/2017 मु पो अॉ.कलम 142,122,135, अॉर्म आक्ट 4/25 प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला.